सातारा वनक्षेत्रा तील वर्णे परिसरात 10 हेक्टर क्षेत्रावर 2780 वृक्षाची लागवड करण्यात आली. या खड्यां साठी 25 लाख 57 हजार रुपये खर्च केल्याचं सातारा वनक्षेत्रपाल एम.एस.पाटील यांनी कागदोपत्री दाखवलंय. पण वास्तवात ही साईट पाहिली असता काही ठिकाणी खोदलेले खड्डे मुरुम आणि मातीमध्येच खोदल्याचं दिसून आले. तरीदेखील त्यांनी हार्ड रॉकमध्ये ब्लास्ट करुन सर्वच खड्डे खोदल्याचं चार पट वाढीव इस्टीमेट केल्याच दिसून आलं.नदी काठची गाळयुक्त माती - शेणखता साठी वर्णे या साईटवर 16 लाख 51 हजार रुपये खर्च केलेत. पण प्रत्यक्षात इथंदेखील गाळयुक्त माती आणि शेणखत कुठं घातलं हे मात्र सापडलेलं नाही. वर्णेच्या साईटनंतर कराड वनक्षेत्रातील राजमाची या वृक्षारोपनाच्या ठिकाणी पाहाणी केल्यानंतर तिथंही दहा हेक्टर क्षेत्रा वरील 2780 रोप खड्डे काढण्यासाठी नियम बाह्यरीत्या अतिरीक्त 19 लाख 73 हजार खर्च केल्याच बिलात दिसून येतंय. पण प्रत्यक्षात जागेवर याचा खर्चच झालं नसल्याचं इथं आल्यानंतर उघड झालं.
आमच्या प्रतिनिधींनी कराडच्या वनरक्षक आणि वॉचमन यांना वन विभागा च्याच कागदपत्राचा आधार घेवून प्रश्न विचारायला सुरवात केली, त्यावेळी मात्र त्यांची बोलती बंद झाली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews